आरोग्य विज्ञान विद्यापीठाची निवडणूक, ३२ केंद्रांवर होणार मतदान

सामना प्रतिनिधी । मुंबई

महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ, नाशिकच्या सिनेटसह विविध प्राधिकरणांची निवडणूक २८ डिसेंबर रोजी होणार आहे. या निवडणुकीचे मतदान मुंबईसह राज्यभरातील ३२ केंद्रांवर होणार आहे.

आरोग्य विज्ञान विद्यापीठाने याबाबत प्रसिद्धीपत्रक जाहीर करून मतदान केंद्रांची माहिती दिली आहे. यानुसार भायखळा येथील ग्रॅण्ट मेडिकल कॉलेज, जे. जे. हॉस्पिटल कंपाऊंड, सेठ जी. एस. मेडिकल कॉलेज, केईएम हॉस्पिटल कंपाऊंड, टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज, वरळी येथे आर. ए. पोदार आयुर्वेद कॉलेज, शीव येथे लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज, रत्नागिरी जिह्यातील खेड येथे एस.ए.एस.एस. योगीता डेंटल कॉलेज ऍण्ड हॉस्पिटल, खारघर नवी मुंबई येथे येरळा मेडिकल ट्रस्ट आयुर्वेदिक कॉलेज आणि राज्यातील इतर केंद्रांवर मतदान करता येणार असल्याचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी सांगितले आहे.

३० डिसेंबरला मतमोजणी
मतदानाबाबत अधिक माहिती www.muhs.aced.in या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. गुरुवार, २८ डिसेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होईल. मतमोजणी ३० डिसेंबर रोजी विद्यापीठाच्या मुख्यालयात करण्यात येईल. ताबडतोब निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले.