फेसबुक पेजला 15 हजार ‘लाइक’ असणाऱ्यालाच विधानसभेचे तिकीट!


सामना ऑनलाईन । भोपाळ

गेल्या 15 वर्षांपासून मध्य प्रदेशमध्ये सत्तेत असणाऱ्या भाजपला पराभूत करण्यासाठी सोशल मीडियावर लक्ष केंद्रित करण्यावर काँग्रेसकडून पावले उचलण्यात येत आहेत. या धोरणांतर्गत निवडणुकीतील उमेदवारी मिळविण्यासाठी सोशल मीडियावर ऑक्टिव्ह असणे कार्यकर्त्यांना बंधनकारक केले आहे. ज्या कार्यकर्त्यांचे फेसबुकवर 15 हजार लाइक्स आणि ट्विटरवर पाच हजार फॉलोअर्स असतील अशाच कार्यकर्त्याला विधानसभेचे तिकीट देण्यात येईल, असे फर्मान मध्य प्रदेश काँग्रेसने समितीने काढले आहे.

मध्य प्रदेश काँग्रेस कमिटीने उमेदवारीसाठी इच्छुक असलेले नेते आणि कार्यकर्त्यांना यासंदर्भात एक पत्रही पाठविले आहे. इच्छुक असलेले कार्यकर्ते आणि पदाधिकाऱयांनी 15 सप्टेंबरपर्यंत फेसबुक, ट्विटर आणि व्हॉटस्ऍपबाबतचा तपशील मध्य प्रदेश काँग्रेस समिती आणि आयटी विभागाला देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मध्य प्रदेशमध्ये गेल्या पंधरा वर्षांपासून भाजपची सत्ता असून या वर्षअखेरीस राज्यात निवडणूक होणार आहे.

summary- election seats for popular person on Facebook says MP congress