मतदान शाईने कर्मचाऱ्याची बोटे जायबंद; सरकारी कारभार ‘ना दाद, ना फिर्याद’

1

सामना प्रतिनिधी, जिंतूर

परभणी लोकसभा निवडणूक 18 एप्रिल रोजी पार पडली. या प्रक्रियेतील मतदान करतांना मतदारास डाव्या हाताच्या वरच्या दुसऱ्या बोटास मतदान करणाऱ्यास करणाऱ्यास जी निवडणूक कर्मचाऱ्याकडून निशाणी म्हणून शाई लावली जाते हे सर्व श्रुत आहे सदर शाई बोटाच्या वरच्या भागास लावलेली शाई अनेक दिवस निघता निघत नाही. जी मतदाताच्या बोटाच्या वरच्या बाजूस लावतात पण हीच शाई उजव्या हाताच्या तळहाताच्या बाजूस लागून काय विपरीत घडू शकते याची प्रचिती जिंतूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सुपरवायझर पदावर कार्यरत डि.टी. राऊत यांच्या उजव्या हाताकडील तळहाच्या बाजूकडील बोटावर हीच निवडणूक प्रक्रियेतील शाई लागल्याने त्यांची बोटे जायबंद होण्याच्या स्थितीत झाली आहेत.

पूर्णा तालुक्यातील बलसा येथे राऊत यांची पोलिंग ऑफिसर नंबर 3 म्हणून नियुक्ती झाली. आपले कर्तव्य करण्यासाठी निवडणूक सेवेवर रुजूही झाले. पण सदरील मतदान प्रक्रियेत काम करत असताना त्यांच्या उजव्या हाताच्या तळ हाता बाजूच्या बोटात शाई लागल्यामुळे त्यांना त्याच रात्री सदरील बोटात आग भडकण्याचा भयंकर त्रास सुरू झाला दुसऱ्या दिवशी शाईने प्रभावित झालेल्या जागेस छिद्र पडल्याचे व्रण उमटू लागले. या प्रभावित ठणकण्याचा भयंकर प्रकार जाणवत असल्यामुळे त्यांनी जिंतूर येथील डॉ. कान्हडकर डॉ. लहाने यांच्याकडे इलाज सुद्धा केला पण 18 एप्रिल ते 22 एप्रिलदरम्यान कोणताच फरक न पडल्याने त्यांनी परभणीला त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टरकडे जावे लागले.

निवडणुकीदरम्यान शासनाकडून मिळणारा भत्ता त्यापेक्षा जास्त खर्च त्यांना त्यांच्या दुखापत झालेल्या इलाजावर करावा लागण्याची वेळ राऊत यांच्यावर आली. निवडणूक प्रक्रिया वापरली जाणारी ही शाही कालबाह्य होती का? असा प्रश्न निर्माण होत आहे. मात्र या प्रकरणात वरिष्ठ स्तरावर निवडणुक विभाग यावर काय दखल घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.