भाजप राक्षस आहे, कोरोनाबाबत पंतप्रधान खोटे बोलले; केजरीवाल यांचा हल्लाबोल

पाच राज्यांच्या निवडणुकांपूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजप आणि काँग्रेस दोघांवरही निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाकाळात झालेल्या मजूरांच्या स्थलांतराबाबत केलेले विधान अयोग्य असल्याचे ते म्हणाले. पंतप्रधानांनी कोरोनाबाबत खोटे आणि अयोग्य विधान केले आहे. पंजाबमध्ये सध्या काँग्रेसचे अस्तित्व धोक्यात असून चरणजीत चन्नी दोन्ही मतदारसंघातील पराभूत होतील, असेही केजरीवाल म्हणाले.

कोरोना काळात दिल्ली आणि महाराष्ट्रातील सरकारने तेथे काम करणाऱ्या मजूरांना उत्तर प्रदेश, बिहार यासारख्या त्यांच्या मूळ गावी परत पाठवले. त्यामुळे देशात कोरोना वाढल्याचे पंतप्रधानांनी सोमवारी लोकसभेत केलेल्या संबोधनात सांगितले. पंतप्रधानांचे हे वक्तव्य खोटे आणि अयोग्य असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले.

राजकारण्यांनी आणि नेत्यांनी आरोप-प्रत्यारोप करणे अयोग्य आहे. त्यामुळे जनतेते चुकीचा संदेश जातो, असेही ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांनी आपल्यावर जे आरोप केले आहेत, त्याला आपण ट्विट करून प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे हा विषय आपल्यासाठी संपला आहे, असेही केजरीवाल यांनी स्पष्ट केले.

आपल्याला राजकारण करता येत नाही, हा आपला सर्वात मोठा दोष आहे. आपल्याया टीका किंवा आरोपही करता येत नाहीत. आपल्याला शाळा सुरू करताय येतात, सुरळीत आणि स्वस्त वीजपुरवठा करता येतो, या गोष्टी आपल्याला करता येतात. देशात कुठेही शाळा सुरू करायच्या असतील, रुग्णालये उभारायाची असतील, वीजपुरवठ्याबाबत काही समस्या असतील, तर आपल्याला बोलवा. ते काम आपण करू शकतो. भाजपला त्यांचे राजकारण लखलाभ असो. आपण आपल्याला करता येते, ती कामे करणारच, असे केजरीवाल यांनी स्पष्ट केले.

भाजप राक्षस असून ते अधर्माचे राजकारण करत आहेत. आपची हिंदुत्त्वाची भूमिका योग्य असल्याचेही ते म्हणाले. पंजाब निवडणुकांबाबत व्यक्तव्य केले. सध्या पंजाबमध्ये काँग्रेसचे अस्तित्व दिसतच नाही. पंजाबमध्ये चरणजीत चन्नी दोन्ही मतदारसंघातून पराभूत होतील, असेही ते म्हणाले.