पतंग उडवा, पण वीज वाहिन्यांपासून दूर

100

सामना प्रतिनिधी । मुंबई

मकरसंक्रांतीनिमित्त मुंबईभर पतंगबाजी जोरात सुरू असून ठिकठिकाणी पतंग महोत्सवाचे आयोजन सुरू आहे. त्यामुळे पतंगबाजीच्या आनंदावर विरजण नको म्हणून पतंग उडवा, पण वीज वाहिन्यांपासून दूर असे आवाहन अदानी इलेक्ट्रिसिटीने मुंबईकरांना केले आहे. पतंग उडवत असताना मांजाचा खांबावरून जाणाऱया उच्च दाब वीज वाहिन्यांशी संपर्क आल्यास अपघाताची, आग लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पतंगबाजी करताना खबरदारी घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मुंबई शहराबरोबरच उपनगराच्या वीज पुरवठय़ासाठी डहाणू, सालशेत, कळवा, ठाणे येथून मुंबईत उच्च दाब वीज वाहिन्यांच्या माध्यमातून वीज आणली आहे. या वाहिन्यांचे जाळे बोरिवली, वर्सोवा, ओशिवरा, गोरेगाव, मालाड, कांदिवली, मुलुंड, भांडुप, चेंबूर, शीव, बीकेसी परिसरात मोठय़ा प्रमाणात पसरले असून त्यामध्ये सुमारे 22 हजार व्होल्टचा वीज प्रवाह असतो. अपघात झाल्यास किंवा आग लागल्यास 19122 या अदानी इलेक्ट्रिसिटीच्या हेल्पलाइनवर संपर्क करावा.

आपली प्रतिक्रिया द्या