केंद्राचा शॉक! वीज बील २० टक्क्यांनी महागणार

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

देशात वीज २० टक्क्यांनी महागणार आहे. सध्या एक किलोवॅट विजेचा दर ५ रुपये आहे. त्यात ६२ ते ९३ पैसे इतकी वाढ केली जाऊ शकते. केंद्रीय ऊर्जा मंत्री आर.के. सिंह यांनी लोकसभेत ही माहिती दिली. कोळशावर चालणाऱया वीज निर्मिती प्रकल्पांचे आधुनिकीकरण केले जात आहे. त्यानंतर वीज दरवाढ केली जाईल.