मुलायम सिंह यांना ‘करंट’, ४ लाखाचे थकीत वीज बिल भरण्याचे आदेश 

सामना ऑनलाईन । इटावा
उत्तर प्रदेशात मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच योगी आदित्यनाथ यांनी धडक कारवाईला सुरुवात केली आहे. गुरुवारी समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यांच्या घरावर वीज विभागाच्या अधिकाऱ्यांनी अचानक छापा टाकला. छाप्यानंतर मुलायम सिंह यांच्या घरात फक्त ५ किलोवॅट विजेचा मीटर लावला असल्याची बाब समोर आली. मात्र त्यांच्या घरात ८ पट जास्त विजेचा वापर होत असल्याचं निष्पन्न झाले. याशिवाय मुलायम सिंह यांनी ४ लाख रुपये वीज बिलदेखील थकवल्याची बाब  समोर आली. हे थकलेलं त्यांना या महिन्याच्या अखेरपर्यंत भरण्याचा मुदत देण्यात आली आहे.
इटावामध्ये सर्वात मोठा बंगला मुलायम सिंह यांचा आहे. वीज ओव्हरलोडिंगची तपासणी सुरू असतांना ही वीजचोरीची बाब अधिकाऱ्यांच्या निदर्शनात आली. आता मुलायम यांच्या घरी ४० किलोवॅटचा नवीन मीटर वीज विभागानं बसवला आहे. तपासणी सुरू असताना मुलायम सिंह घरी नव्हते. यूपीतील सत्ता बदलानंतर योगी आदित्यनाथ यांनी भ्रष्टाचाराविरोधात मोर्चा उघडला होता. वीज चोरीमध्ये इटावा अव्वल स्थानी आहे. याच पार्श्वभूमीवर वीज विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही मोहीम सुरू केली आहे. मात्र या सगळ्या कारवाईत मुलायम सिंह यांना चांगलाच ‘करंट’ लागला आहे.
  • Ganesh Puranik

    सत्तेचा माज उतणार…