फुगा फुटल्याने घाबरलेल्या हत्तिणीने माहूताला सोंडेत धरून आपटलं

सामना ऑनलाईन।तिरूअनंतपुरम

अचानक फुगा फुटल्याने बिथरलेल्या हत्तिणीने माहूताला गंभीररित्या जखमी केलेलं आहे. ही घटना तिरूअनंतपुरममधील तिरूमला इथल्या प्रसिद्ध श्री वेंकटेश्वरा देवस्थानातील ही घटना आहे.
या मंदीराचे उपकार्यकारी अधिकरी कोदंड राव यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की या मंदीरामध्ये एक लहान मुलगा पालकांसह आला होता. त्याच्या हातामध्ये फुगा होता, जो अचानक फुटला. या आवाजाने हत्तीण घाबरली आणि तो बेकाबू झाली. तिने पाठीवर स्वार असलेल्या माहुताला सोंडेने धरून जोरात आपटलं. हा माहूत जवळच असलेल्या गेटवर जाऊन पडला ज्यामुळे तो गंभीररित्या जखमी झालाय. या माहुताला ताबडतोब देवस्थानातील रूग्णालयात दाखल करण्यात आलं.
लक्ष्मी आणि अवनीजा या दोन माहूत स्वार असलेल्या हत्तिणी देवस्थानाच्या दैनंदीन सोहळ्यात भाग घेण्यासाठी आणण्यात आल्या होत्या. त्यातल्या एका हत्तिणीने माहूताला घाबरल्यानं सोंडेत धरून आपटलं. रूग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार माहूत जबर जखमी झालाय, मात्र त्याच्या जीवाला धोका नाहीये.