एल्फिन्स्टन पूल दुर्घटनेतील जखमींना मानसिक धक्का

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबईतल्या एलफिन्स्टन रोड स्थानकाच्या पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत जखमी झालेल्यांपैकी पाचजणांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. या जखमींवर मानसोपचार तज्ज्ञ उपचार करत असल्याची माहिती केईएम रुग्णालयाच्या डॉ. शुभांगी पारकर यांनी दिली आहे.

मागील महिन्यात २९ सप्टेंबर रोजी परळ आणि एलफिन्स्टन रोड या स्थानकांना जोडणाऱ्या पादचारी पुलावर चेंगराचेंगरी झाली होती. या दुर्घटनेत २३ जणांचा मृत्यू झाला होता आणि अनेकजण जखमी झाले होते. जखमींपैकी पाचजणांना मानसिक धक्का बसला आहे. त्यांना सावरण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल, असे केईएम रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले.