दर दिवशी साडेचार लाखांपेक्षा जास्त कमाई करणारी अभिनेत्री

सामना ऑनलाईन, वॉशिंग्टन

फोर्ब्जने सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्रींची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये एमा स्टोन नावाच्या अत्यंत सुंदर अभिनेत्रीने पहिले स्थान पटकावले आहे. ला ला लँड या ऑस्कर विजेत्या चित्रपटात भूमिका करणाऱ्या या अभिनेत्रीने जून २०१६ ते जून २०१७ या काळात तिने १७ कोटींची कमाई केली आहे. म्हणजेच एका दिवसाला तिने ४ लाख ६५ हजारांपेक्षा जास्तीची कमाई केली आहे.

jenifer-aniston

या यादीमध्ये एकाही हिंदुस्थानी अभिनेत्रीला स्थान मिळालेलं नाहीये. एमा स्टोनने जेनिफर अॅनिस्टनला मागे टाकत पहिला क्रमांक मिळवला आहे. जेनिफर कमाईच्या बाबतीत दुसऱ्या स्थानावर आहे

emma-watson
सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत एमा वॉटसन या एकमेव ब्रिटीश अभिनेत्रीचा समावेश आहे

गेली २ वर्ष जेनिफर लॉरेन्स या अभिनेत्रीने या यादीमध्ये पहिला नंबर मिळवला होता, यंदा मात्र ती तिसऱ्या स्थानावर फेकली गेलीय. ७ कोटींपेक्षा जास्त कमाई करणाऱ्या अभिनेत्रींना या यादीमध्ये स्थान मिळालं आहे.  सर्वाधिक कमाई करणाऱ्या एमा स्टोनने काही दिवसांपूर्वी अभिनेते आणि अभिनेत्री यांना मिळणाऱ्या मानधनातील तफावतीचा मुद्दा उपस्थित केला होता. सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांची यादी अजून प्रसिद्ध झाली नसली तरी अभिनेत्यांच्या तुलनेत अभिनेत्रींची कमाई निम्म्याहूनही कमी आहे.