निवडणूक ड्युटीवरील शिक्षकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

4
प्रातिनिधीक फोटो

सामना ऑनलाईन, कानेर

छत्तीसगडमधील कानेर जिह्यातील एका मतदान केंद्रावर निवडणुकीच्या डय़ुटीवर असलेल्या एका शिक्षकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना आज घडली. तुकालू राम नारेटी असे मृत शिक्षकाचे नाव आहे. सरकारी शाळेत ते सहाय्यक शिक्षक होते. कानेर लोकसभा मतदारसंघातील अंतागड पसिरातील कामता बूथ (क्रमांक 186) येथे तुकालू राम नारेटी यांना निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्त केले होते.

आज सकाळी 6 वाजता नारेटी यांनी छातीत कळ येत असल्याची तक्रार केली. नंतर ते बेशुद्ध झाले. त्यांना स्थानिक रुग्णालयात तातडीने नेण्यात आले, मात्र तोपर्यंत त्यांचे निधन झाले होते. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.