रॉबर्ड वाड्रांची जमीन ईडीकडून जप्त

robert-vadra

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्यावर अंमलबजावनी संचालनालयाने मोठी कारवाई केली आहे. वाड्रा यांची बिकानेर येथील जमीन अंमलबजावणी संचलनालयाने (ई़डी) सील केली आहे. बिकानेरमधील सुमारे १०० एकरपेक्षा जास्त जमीन ७९ लाखात खरेदी केल्याचा आरोप रॉबर्ट वाद्रा यांची कंपनी स्कायलाइट हॉस्पिटॅलिटीवर आहे. तीन वर्षांनी हीच जमीन कंपनीने ५ कोटींना विकली. जमीन व्यवहारात अपहार झाल्याचा आरोप वाड्रा यांच्यावर आहे.

जमीन सील केल्यानंतर अंमलबजावणी संचलनालयाने त्या जागेवर आपला फलक लावला आहे. या जमीन प्रकरणात जयप्रकाश बागरवा आणि अशोक कुमार यांना २०१७ मध्ये अटक करण्यात आली आहे