इंग्लंड-ऑस्ट्रेलियाचे खेळाडू महिनाभरच आयपीएल खेळणार, वाचा कारण…

2

सामना ऑनलाईन । मुंबई

आगामी वर्षी होणाऱया इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) टी-20 क्रिकेट स्पर्धेत इंग्लंड क ऑस्ट्रेलियाचे खेळाडू महिनाभरच उपलब्ध असणार आहेत. आगामी वर्षी इंग्लंडमध्ये होणाऱया विश्वचषक स्पर्धेच्या तयारीसाठी या दोन्ही देशांचे क्रिकेटपटू मायदेशी परतणार असल्याचे त्यांच्या क्रिकेट बेर्डाने ‘बीसीसीआय’ला कळविल्याचे समजते.

विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या ‘आयपीएल’ स्पर्धेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. एरवी एप्रिलमध्ये सुरू होणारी ही टी-20 स्पर्धा यावेळी 29 मार्चला सुरू होणार आहे. 2019 सालचा विश्वचषक 30 मेपासून इंग्लंडमध्ये खेळकला जाणार आहे.