चहापानानंतर इंग्लंडचा डाव गडगडला; कूक, अलीची अर्धशतके

सामना ऑनलाईन । लंडन

हिंदुस्थान व इंग्लंड यांच्यात शुक्रवारपासून येथे सुरू झालेल्या पाचव्या कसोटीच्या पहिल्या दिवशी यजमान संघाला चहापानानंतर ‘विकेट बाधा’ झाली. चहापानापर्यंत 1 बाद 123 अशा स्थितीत असलेल्या इंग्लंडची अवस्था पहिल्या दिवसअखेर 7 बाद 198 धावा अशी झाली. अखेरचा कसोटी सामना खेळणाऱया ऑलिस्टर कूकने 71 धावांची तर मोईन अलीने 50 धावांची खेळी साकारली. इशांत शर्मा (3 बळी), जसप्रीत बुमराह (2 बळी) व रवींद्र जाडेजा (2 बळी) यांनी प्रभावी गोलंदाजी केली.

हिंदुस्थानी संघात अश्विनऐवजी जाडेजाची तर हार्दिक पांडय़ाऐवजी हनुमा विहारीची निवड करण्यात आली. विहारीचा हा पहिलाच कसोटी सामना ठरलाय. मुंबईकर पृथ्वी शॉला मात्र संघात स्थान देण्यात आले नाही. कर्णधार विराट कोहलीने या मालिकेतील पाचही कसोटींत नाणेफेक गमावल्या. त्यामुळे जो रूट हा मार्क टेलर (1998) यांच्यानंतर मालिकेतील पाचही कसोटींत नाणेफेक जिंकणारा पहिलाच कर्णधार ठरलाय.

summary- england inning got collapse after tea time