विश्वचषकाआधी पाकिस्तानचा सुपडा साफ, इंग्लंडकडून व्हाईट वॉश

8

सामना ऑनलाईन । लंडन

विश्वचषक स्पर्धा अगदी तोंडावर आलेली असताना पाकिस्तानचा इंग्लंड दौऱ्यावर अक्षरशः धुव्वा उडाला. यजमान इंग्लंडने एकदिवसीय मालिकेत 4-0 असे निर्भेळ यश संपादन केले. सलामीचा सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर इंग्लंडने पुढील चारही लढती जिंकून आपण विश्वचषकासाठी सज्ज असल्याचा इशारा क्रिकेटविश्वाला दिला.

पाचव्या व अखेरच्या लढतीत इंग्लंडकडून मिळालेल्या 352 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव 46.5 षटकांत 297 धावांवरच गारद झाला. ख्रिस वोक्सने फकर झमान (0), अबीद अली (5) व मोहम्मद हाफडज (0) ही आघाडीची फळी 6 धावांतच तंबूत पाठविली. पाकिस्तानची 3 षटकांत 3 बाद 6 अशी केविलवाणी स्थिती झाली, मात्र त्यानंतर बाबर आझम आणि सर्फराज अहमद यांनी 146 धाकांची भागीदारी करून पाकिस्तानचा डाव सावरला. बाबर आझम 80 धाकांकर धावबाद झाल्याने ही जोडी फुटली. त्यानंतर 27 क्या षटकात आदिल रशीदच्या गोलंदाजीकर सर्फराज बाद झाला. सर्फराजही 97 धाकांकर धाकबाद झाला. त्यानंतर सामना पुन्हा एकदा इंग्लंडच्या पकडीत आला आणि इंग्लंडने ती संधी दकडली नाही. हा सामना 54 धाकांनी जिंकून पाकला क्हाइट कॉश दिला. इंग्लंडकडून ख्रिस वोक्सने 5 फलंदाज बाद केले. अदिल रशिदने 2 तर डेव्हिड विलीने 1 बळी टिपला.

त्या आधी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडला जेम्स क्हिन्स आणि जॉनी बेअरस्टो यांनी जोरदार सुरुकात करून दिली. या दोघांनी 63 धाकांची भागीदारी केली. शाहीन आफ्रिदीने ही जोडी फोडली. त्याने क्हिन्सला (33) बाद केले. त्यापाठोपाठ इमाद कासीमने बेअरस्टोला (32) तंबूचा रस्ता दाखकला. त्यानंतर जो रूट आणि कर्णधार इयॉन मॉर्गन यांनी इंग्लंडचा डाक साकरला व मोठय़ा धाकसंख्येच्या दिशेने कूच करून दिली. या दोघांनी तिसऱ्या किकेटसाठी 117 धाका केल्या, पण आफ्रिदीने इंग्लंडच्या कर्णधारालाही बाद केले. मॉर्गन 64 चेंडूंत 4 चौकार क 5 षटकार खेचून 76 धाका करून माघारी परतला. त्यानंतर रूटने 84 आणि जोस बटलर (34) क टॉम करन (नाबाद 29) यांनी इंग्लंडला 9 बाद 351 धाकांचा मोठा पल्ला गाठून दिला.

आपली प्रतिक्रिया द्या