अबब.. पूल आहे की रोलरकोस्टर?

1

सामना ऑनलाईन । टोकियो

आयुष्यात एकदातरी एखादा थरारक अनुभव घ्यावा, अशी कित्येकांची इच्छा असते. त्यामुळे सुट्ट्या पडल्या की असे सर्वजण अम्युझमेंट पार्कची वाट धरतात. मग तिथे असलेल्या अनेक थरारक आणि हृदयाचा ठोका चुकवणाऱ्या राइड्सचा आनंद घेतला जातो. पण, जपानमध्ये असा एक पूल आहे, ज्यावर रोज कित्येक गाड्या प्रवास करतात आणि रोजच थरारक राइडचा अनुभव घेतात.

खरंतर, पूल पार करणं ही तशी सामान्य बाब आहे. जपानमध्ये ‘एशिमा ओहाशी’ नावाचा एक पूल आहे, जो जपानच्या मॅटसू आणि सकायमिनाटो या दोन शहरांना जोडतो. पण, या पुलाची रचना इतकी खतरनाक आहे, की लांबून बघताना हा पूल नसून एखादी रोलरकोस्टर राइड असावी, असा भास होतो. या पुलाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून तो बघताना या पुलाची रचना काळजाचा ठोका चुकवते. गंमत म्हणजे दिसायला धोकादायक वाटणाऱ्या या पुलावरून गाड्या मात्र अतिशय आरामात प्रवास करताना पाहायला मिळतात. ‘एशिमा ओहाशी’ हा जपानमधला सर्वात मोठा आणि जगातला तिसऱ्या क्रमांकाचा धोकादायक पूल आहे.

पाहा या पुलाचा व्हिडिओ-