‘ESPN’ च्या सर्वोत्तम खेळाडूंच्या यादीत रोनाल्डोच अव्वल स्थानी,विराट टॉप 10मध्ये

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तीयानो रोनाल्डो हा जगातील ‘फेमस’ खेळाडू ठरला आहे. ‘ईएसपीएन’ या क्रीडा वेबसाइटकडून जगातील 100 फेमस खेळाडूंच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली. हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सातव्या क्रमांकावर विराजमान आहे. 100 खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीसह हिंदुस्थानचे नऊ खेळाडू आहेत.

सर्वोत्तम दहा फेमस खेळाडूंची यादी

1) ख्रिस्तीयानो रोनाल्डो (पोर्तुगाल, फुटबॉल)

2) लेब्रॉन जेम्स (अमेरिका, बास्केटबॉल)

3) लियोनेल मेस्सी (अर्जेंटिना, फुटबॉल)

4) नेमार (ब्राझील, फुटबॉल)

5) कॉनर मॅकग्रेगॉर (आयर्लंड, मिक्स मार्शल आर्ट)

6) रॉजर फेडरर (स्वित्झर्लंड, टेनिस)

7) विराट कोहली (हिंदुस्थान, क्रिकेट)

8) रफाएल नदाn (स्पेन, टेनिस)

9) स्टीफन कॅरी (अमेरिका, बास्केटबॉल)

10) टायगर वूडस् (अमेरिका, गोल्फ)