‘न्यूटन’ निघाला ऑस्करला!

सामना ऑनलाईन । मुंबई

हिंदुस्थानकडून ‘न्यूटन’ सिनेमा ऑस्करसाठी पाठवण्यात येत आहे. सिने-समीक्षकांनी न्यूटन सिनेमाला आधीच पंसती दिली होती. बेस्ट फॉरेन फिल्म कॅटेगरीमध्ये या सिनेमाला नामांकन मिळालं आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या सिलेक्शन कमिटीने शुक्रवारी ही घोषणा केली आहे. २६ सिनेमे या शर्यतीत होते, यामधून ‘न्यूटन’ची निवड करण्यात आली आहे.

मराठमोळ्या अमित मासुरकरनं सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून अभिनेता राजकुमार राव सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. राजकुमारसोबत पंकज त्रिपाठी, संजय मिश्रा, अंजली पाटील, रघुवीर यादव यांच्याही सिनेमात भूमिका आहेत. सिनेमा २२ सप्टेंबरला जवळपास ३५० स्क्रिन्सवर प्रदर्शित झाला आहे. राजकुमार रावने ऑस्करमध्ये सिनेमा गेल्यानं आनंद व्यक्त केला आहे.

या सिनेमांसोबत ‘न्यूटन’चा होणार सामना
स्वीडनच्या ‘द स्क्वायर’, जर्मनीच्या ‘इन द फेड’, कंबोडियाच्या ‘फर्स्ट दे किल्ड माई फादर’, पाकिस्तानच्या ‘सावन’ सोबत ‘न्यूटन’चा सामना होणार आहे. ९०व्या अकॅडमी अॅवॉर्डचं आयोजन ४ मार्च २०१८ला लॉस अॅन्जोलिसमध्ये होणार आहे. सिने-समीक्षकांनी ‘न्यूटन’ सिनेमासाठी ४.५ पर्यंत रेटिंग दिली आहे.