2004 ग्रेनेड हल्लाप्रकरण; माजी पंतप्रधान खालिद झियांच्या मुलाला जन्मठेप


सामना ऑनलाईन । ढाका

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा जिया यांचा मुलगा तारिक रहमानसह 19 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 2004 मध्ये तत्कालिन विरोधी पक्षनेत्या शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाच्या रॅलीवर ग्रेनेड हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्याप्रकरणी तारिक यांच्यासह 19 जणांना जन्मठेपेची तर इतर 19 जणांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

बांगलादेशच्या तत्कालिन विरोधी पक्षनेत्या शेख हसीना यांना टार्गेट करण्यासाठी 21 ऑगस्ट 2004 रोजी हा ग्रेनेड हल्ला करण्यात आला होता. या हल्यात हसीना यांच्यासह 500 लोक जखमी झाले होते. तसेच अवामी लीगच्या 24 नेत्यांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यातून हसीना या थोडक्यात बचावल्या होत्या. याप्रकरणी ढाकातील एका न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. तारिक सध्या फरार असून इंग्लंडमध्ये निर्वासितांचे जिने जगात आहे. हल्ला झाला तेव्हा तारिक बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचा (बीएनपी) उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होता. मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आलेल्यांमध्ये माजी गृहराज्य मंत्री लुत्फोजमां बाबर यांचाही समावेश आहे. हरकतुल जिहाद अल इस्लामी या दहशतवादी संघटनेला हाताशी धरून हा हल्ला घडविण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झालं होतं.