रशियात पुतिन यांना भिडणार पॉर्नस्टार

सामना ऑनलाईन । मॉस्को

रशियात पुढल्या वर्षी (२०१८) होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत व्लादिमिर पुतिन यांच्याविरोधात पूर्वाश्रमीची पॉर्नस्टार एलिना बर्कोवा निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे. इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करुन एलिना बर्कोवाने आपली योजना जाहीर केली. सत्तेत आल्यास लैंगिक शोषण करणाऱ्यांना कठोर शिक्षा करेन, असे एलिनाने सांगितले. लैंगिक शोषण करणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्यायलाच हवी, अशा मताची असल्याचे एलिनाने सांगितले. मला रशियाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली तर देशात ४० सेमीपेक्षा मोठ्या स्कर्टवर बंदी घालेन, असेही तिने सांगितले.

अनेक पुरुष स्वार्थ साधून झाल्यावर घटस्फोट घेऊन महिलेला वाऱ्यावर सोडतात. रशियात हे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे सत्तेत आल्यास पुरुषांना सहज घटस्फोट मिळू नये यासाठी विशेष तरतूद करणार असल्याचे एलिना म्हणाली. शाळेत मुलांना लैंगिक शिक्षण देण्याची तरतूद करेन आणि या विषयाची चाचणी घेण्यासाठी परीक्षेची व्यवस्था करेन, असेही ती म्हणाली.

याआधी एलिनाने सोचीच्या महापौरपदाची निवडणूक लढवली होती. तिने राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवल्यास रशियात राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवणारी ती चौथी महिला ठरेल.