Exit poll हरयाणात पुन्हा भाजपचाच डंका

96
bjp-logo

सामना ऑनलाईन । मुंबई

हरयाणामध्ये यावेळी लोकसभा निवडणुकीत एकुण10 जागांपैकी भाजप तब्बल 8 जागांवर विजय मिळवणार असल्याचा अंदाज टाईम्स नाऊच्या एक्झिट पोलमध्ये वर्तविला आहे. हरयाणामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी भाजप, काँग्रेस आणि इंडियन नॅशनल लोकदल यांच्यात मुख्य लढाई आहे. मात्र भाजपच पुन्हा एकदा बाजी मारणार असल्याचे एक्झिट पोलमध्ये म्हटले आहे.

हरयाणामध्ये 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 7 जागांवर विजय मिळवण्यात यश मिळाले होते. तर, काँग्रेसला फक्त एका जागेवर समाधान मानावं लागलं होतं. इंडियन नॅशनल लोकदलचे 2 उमेदवार निवडून आले होते. त्यामुळे हरयाणामध्ये  काँग्रेस आणि इंडियन नॅशनल लोकदल समोर त्यांच्या जागा राखण्याचे मोठे आव्हान आहे.

आपली प्रतिक्रिया द्या