Exit poll बिहारमध्ये एनडीए राज, राजदचा होणार सुपडा साफ

9

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

बिहारमध्ये एनडीएलाच सर्वाधिक जागा मिळणार असल्याचा अंदाज बहुंतांश एक्झिट पोलमधून वर्तविण्यात आला आहे. बिहारच्या जनतेने भाजप-जदयू-लोजपच्या युतीला सर्वाधिक जागा दिल्या असाव्यात असा अंदाज लावण्यात येत आहे. यात राजदला तर सर्वात कमी जागा मिळणार असल्याचे देखील भाकित वर्तविण्यात आले आहे.

टाईम्स नाउ वीएमआरनुसार बिहारमध्ये एनडीएला 30 आणि यूपीएला अवघ्या 10 जागा मिळतील. जन की बात च्या आकड्यांनुसार एनडीएला 29, यूपीएला10 आणि इतर 1 जागावंर विजयी होऊ शकतात. सी वोटरनुसार एनडीएला 33 जागा आणि यूपीएला अवघ्या 7 जागा मिळण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या