फिर एक बार एनडीए सरकार, जाणार 300 पार; एक्झिट पोलचे ‘रंपाट’ अंदाज

264

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

देशभरातील मतदान संपल्यानंतर आता निकालाची उत्सुकता लागलेली असतानाच रविवारी संध्याकाळी एक्झिट पोलचे कल समोर आले आहेत. आतापर्यंतच्या सर्व एक्झिट पोलनुसार देशात पुन्हा एकदा बहुमत मिळवत एनडीएचीच सत्ता येणार असल्याचे समोर आले आहे. एनडीएला 286 ते 306 पर्यंतच्या जागा मिळू शकतात असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान बनणार अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

रिपब्लिक CVoter,एबीपी माझा, जन की बात, इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडिया, टाईम्स नाऊ-व्हिएमआर या महत्त्वाच्या एक्झिट पोलनुसार एनडीएलाच सर्वाधिक जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.टाईम्स नाऊ व्हिएमआर नुसार एनडीएला 306, युपीए 132, महागठबंधन 20, इतर 84 जागा मिळणार आहेत. चाणक्यनुसार एनडीए 340, युपीए 70, इतर – 133 जागा मिळतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. रिपब्लिक CVoter नुसार एनडीएला 287, युपीए – 128, सपा-बसपा : 40 जागा मिळणार तर एबीपी माझानुसार देखील एनडीए – 267, युपीए- 137, इतर – 148 जागा मिळणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या