फुलांचे डोळे

>>पूजा तावरे, फॅशन डिझायनर<<

आयलायनर ही एक अशी जादू आहे की, ज्यामुळे तुमचा लूक अधिक आकर्षक बनवून उत्साह वाढतो. आयलायनरमुळे मेकअपला एक वेगळा लूक मिळतो.

नेलकिट्समधील डॉटिंग टूलचा वापर करून डोळ्यांच्या पापण्यांवर फुले काढू शकता. जर हे अवघड वाटत असेल तर तुम्ही रेडिमेड फुले खरेदी करून त्याचा वापर करू शकता. हि रेडिमेड फुले १०, २०, ३० साईजच्या पॅकेटमध्ये उपलब्ध आहेत. चिटकवू शकता. या स्टाईलसाठी लिक्विड लायनरचाही उपयोग होतो.

फॅशन युगात एक नवीन ट्रेंड आला आहे तो म्हणजे फ्लोरल आयलायनर. मेकअप आर्टिस्टनी या फॅशनमध्ये नवनवीन रंग वापरले आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात प्रत्येकाला सकाळी आय मेकअप करायला आवडतो. यासाठी विविध रंग वापरून तुम्ही आकर्षक लूक मिळवू शकता. ब्राइट कलर लिक्विड आयलायनर,स्कॉच टेप,अँगल आयलायनर ब्रश आणि डॉटिंग टूल यांचा वापर करून तुम्ही प्रोफेशनल लूक मिळवू शकता.

आयलायनर कसे लावावे

वरच्या पापणीच्या आतल्या बाजूला एक तीन लायनर लावा. प्रायमरसह आयलेड तयार करा आणि हिरव्या,नारंगी,पिवळ्या आणि गुलाबी यांसारखे आकर्षक रंगामध्ये लिक्विड आयलायनर घ्या. याशिवाय डॉटिंग टूलचा वापर करून तुम्ही आयलेडसह फ्लोरल अरेंजमेंट करू शकता. यावर मस्कारा वापरून अधिक आकर्षक लूक तुम्ही बनवू शकता. फ्लोरल आयलायनरला सोशल मिडियावर चलती दिसून येत आहे आणि भारतातही याफॅशनला मागणी वाढत आहे. या मौसमात अनेक तरुणी,महिला आपल्या डोळ्यांच्या पापण्यांवर विविध प्रकारचे फ्लोरल पॅटर्न वापरताना दिसून येत आहेत.

फ्लोरल आयलायनर अधिक आकर्षक बनविण्यासाठी

>नेल आर्ट कीटमधीलडॉटिंग टूलचा वापर करून फ्लॉवर्स काढू शकता.पेस्टल्सचा वापर कमी ठेवण्यासाठी आणि झगझगा कमीकरण्यासाठी निऑन वापरा.डिफरंट लूकसाठी इतर ट्रेंडसह फ्लोरल लाइन,कटरिज आय शॅडो यांचा एकत्रित वापर करा.फुलांच्या आकारामुळे प्रिटी लूक तर मिळतोच पण त्याचबरोबर तुम्ही पानांचा डिझाईन करून डिफरंट लूक मिळेल

>सिंगल स्ट्रोक, कॅट आईज, स्मज्ड जेल आईज, स्मोकी आईज, स्मज्ड जेल आईज, स्मोकी आईज, कंट्रास्ट कनेक्शन, ग्लिटरी आईज या विविध ट्रेंडचा फ्लोरल आयलायनरमध्ये तुम्ही वापर करू शकता.