चेहरा सांगणार तुमच्या पार्टनरचे रहस्य

सामना ऑनलाईन । न्यूयॉर्क

चेहरा हा मनाचा आरसा असतो असे म्हटले जाते. कारण चेहरा माणसाची मनोदशा त्याचे विचार सांगतो. तुम्ही जसे असता तसेच दिसता. पण हे ओळखण्याच कौशल्य सगळ्यांनाच जमेल असे नाही. यासाठीच ऑंटारियो येथील संशोधकांनी नुकतच एक संशोधन केलं. यात चेहरेपट्टीवरुन समोरच्या व्यक्तीच्या मनातलेच नाही तर त्याचा स्वभाव त्याच्या खाण्यापिण्याच्या आवडी निवडींबरोबरच सेक्समध्ये त्याला असलेल्या रुचीवर सर्व्हेक्षण केलं. त्यातून जे निदर्शनास आले त्यावरुन आता समोरच्या व्यक्तीला डोक्यापासून पायापर्यंत ओळखणं सहज शक्य होणार आहे. ‘अर्काईव्ह ऑफ सेक्सशुअल बिहेवियर’ या जर्नलमध्ये या संशोधनाबद्दल लेख प्रसिद्ध झाला आहे. यात संशोधनातील निदर्शन मांडण्यात आले आहे.

या संशोधनात सहभागी होणाऱ्यांना एक प्रश्नावली देण्यात आली होती. यात दैनंदिन गोष्टींपासून सेक्सबद्दल असलेली त्यांची मत विचारण्यात आली होती.

या संशोधनानुसार मोठा व पसरट चेहरेपट्टी असलेल्या व्यक्ती अधिक कामुक असतात. त्या शांत दिसत असल्याचा आव आणत असल्या तरी त्या प्रचंड रागीट व तापट असतात. त्यांच्या मनात सतत सेक्सचे विचार घोळत असतात. या व्यक्तींचा कल आकर्षक दिसण्याकडे असतो. कमी खर्चात जास्तात जास्त खरेदी करण्यात त्यांना आनंद मिळतो. त्यांच्या पेक्षा भिन्न व्यक्तीमत्व असलेल्या व्यक्तींकडे त्या लवकर आकर्षित होतात.

तर लहान चेहऱ्याच्या व्यक्ती हुशार असतात. त्यांचे व्यवहार ज्ञान उत्तम असते. आपल्या मतांवर ठाम असतात. त्यामुळे अनेकांशी मतभेद होतात. उत्तम वाक्चातुर्य असते. साधे पण ब्रँडेड कपडे वापरायला यांना आवडतात. सेक्समध्ये विशेष रुची नसते. पण यांच्या साधेपणाकडे अनेकजण आकर्षित होतात.

दरम्यान, या संशोधनामुळे जोडीदार निवडणे, मित्र पारखणे सोपे होईल असा विश्वास या संशोधनाचे प्रमुख स्टीव्हन यांनी व्यक्त केला आहे.