आपत्कालीन परिस्थितीत फेसबुक करणार मदत!

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानात नैसर्गिक आपत्कालीन परिस्थिती आता फेसबुक मदत करणार आहे. आपत्कालीन स्थितीत वेगात मदत व्हावी यासाठी फेसबुकने डिजास्टर मॅप फिचर सुरू केलं आहे. फेसबुकद्वारे डिजास्टर मॅप तयार करून डेटा गोळा करण्यात येणार आहे. हा डेटा राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन निवारण प्राधिकरण(एनडीएमए), स्थायी पर्यावरण आणि पारिस्थितीक विकास सोसायटी (सीड्स) यांना उपलब्ध करून दिला जाणार आहे. सीड्स आपत्कालीन स्थितीत मदत करणारी एक संस्था आहे.

डिजास्टर मॅपला आंतरराष्ट्रीय स्थरावर जूनमध्ये समोर आणण्यात आलं. हे फीचर नैसर्गिक आपत्कालीन स्थितीत येणाऱ्या अडचणींच्या सूचना एकत्रित करून मदतकार्यात असलेल्या संस्थाना याची माहिती पोहचवण्याचं काम करणार आहे. आपत्कालीन स्थितीत फेसबुक हा महत्त्वपूर्ण माहितीचा स्रोत असणार आहे. तसेच सिक्युरिटी टेक फीचरच्या मदतीनं तुम्ही तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना तुम्ही सुरक्षित असल्याची माहिती देऊ शकता. लोक फेसबुकच्या माध्यमातून मदकार्यात हातभार लावण्यासाठी फेसबुकच्या माध्यमातून आर्थिक मदतही करू शकणार आहेत. फेसबुकच्या पहिल्या वार्षिक आपत्कालिन प्रतिक्रिया शिखर संमेलनात याची घोषणा करण्यात आली.