फेसबुकवर ‘नको त्या’ कमेंट करणाऱ्यांना करा ‘डाऊनवोट’

सामना ऑनलाईन । मुंबई

फेसबुकवर अनेकजण आपल्या भूमिका उघडपणे मांडत असतात. अशा भूमिका मांडत असताना अनेकजण इतरांच्या पोस्ट नाही आवडल्या की नको त्या कमेंट करतात. एखादी कमेंट आवडली नाही तरी आपण तिला डिस्लाईक करून शकत नाही. कारण ‘डिस्लाईक’चा पर्याय आणणार नाही असं फेसबुकनं आधीच स्पष्ट केलं आहे. मात्र त्याला पर्याय म्हणून फेसबुक लवकरच नवीन ‘डाऊनवोट’ नावाचं बटण आणण्याच्या तयारीत आहे. या बटणावर सध्या फेसबुककडून काम सुरू आहे.

अमेरिकेमध्ये ‘डाऊनवोट’ हे बटण सध्या टेस्ट करण्यात येत आहे. टेकक्रंचच्या रिपोर्टनुसार, हे नवं फीचर फेसबुकला आक्षेपार्ह, असभ्य, गैरसमज पसरवणाऱ्या कमेंटबाबत सावध करेल. प्रत्येक कमेन्टच्या खालील बाजूस म्हणजे लाईक, रिप्लायच्या सोबत ‘डाऊनवोट’ हे नवीन बटण असणार आहे. मात्र युजर्सनं ‘डाऊनवोट’ बटण क्लिक केल्यास, आधी फेसबुक या मागील कारण विचारणार आहे. या कारणांमध्ये आक्षेपार्ह, गैरसमज पसरवणारी आणि विषयाचा संदर्भ सोडून केलेली प्रतिक्रिया असे पर्याय असतील.