फेसबुकवर २० दशलक्ष अकाऊंट फेक

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

डिसेंबर २०१७ पर्यंत तब्बल २० दशलक्ष फेक अकाऊंटस् कार्यरत होती असा खुलासा फेसबुकने केला आहे. सर्वाधिक फेक अकाऊंटस् असणाऱया देशांमध्ये हिंदुस्थान, इंडोनेशिया, फिलिपाईन्स यांचा समावेश आहे. फेसबुक युजर्सच्या संख्येतही झपाटय़ाने वाढ होत आहे. अहवालानुसार ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत फेसबुकचे २.१३ अब्ज मंथली ऑक्टिव युजर्स होते. हा आकडा गतवर्षीच्या तुलनेत १४ टक्के अधिक आहे.