डेटा लीक प्रकरणी ब्रिटनमध्ये फेसबुकला ५ लाख पाऊंडचा दंड

सामना ऑनलाईन । लंडन

केंब्रिज अॅनालिटीका प्रकरणी ब्रिटनमध्ये फेसबुकला पाच लाख पाऊंडचा दंड ठोठावण्यात आला आहे. ब्रिटनची संसदीय समिती याबाबत चौकशी करत होती. युजर्सची माहिती सुरक्षित ठेवण्यात फेसबुकला अपयश आल्याने त्यांना पाच लाख पाऊंडचा दंड ठोठावण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समितीचे अध्यक्ष डेमियल कॉलिन्स यांनी सांगितले. युजर्सचा डेटा सुरक्षित ठेवण्यात फेसबुक अपयशी ठरले असून त्यांनी गोपनीयेतच्या कायद्याचे उल्लंघन केल्याचे कॉलिन्स म्हणाले.