फेसबुकने केले ‘फोटो रिव्यू’ फिचर लाँच

सामना ऑनलाईन । मुंबई

फेसबुक ही सोशल मीडिया साइट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच वयोगटांतीस लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. एकमेकांशी संवाद साधण्यासाठी, भावना व्यक्त करण्यासाठी या माध्यमाचा वापर करण्यात येतो. तसेच अनेकदा एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठीही फेसबुकचा वापर केला जातो. युझरना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी फेसबुक सदैव तप्तर असते. आता फेसबुकने फेशियल रेकग्निशन फीचर ‘फोटो रिव्यू’ लाँच केले आहे. या फीचरमुळे एखाद्या युझरने फोटो अपलोड केला आणि त्या फोटोत तुमचा फोटो असल्यास तुम्हाला अलर्ट मिळणार आहे.

अनेकदा फेसबुकवरून कार्यक्रमाचे, सहलीचे, लग्नसमारंभाचे फोटो शेअर करण्यात येतात. हे फोटो अपलोड केल्यानंतर फोटोतील इतर लोकांना टॅग करण्यासाठी विचारले जाते. मग ज्या व्यक्तीला टॅग करायचे आहे. त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर क्लिक करुन त्या व्यक्तीचे नाव तिथे टाईप करावे लागते. त्यामुळे त्या व्यक्तीच्या वॉलवरही तो फोटो दिसतो. परंतु या नवीन फीचरमध्ये तुम्हाला एखाद्याने टॅग न करता फोटो टाकला तरीसुद्धा तुम्हाला त्याचे नोटीफिकेशन मिळू शकेल.

फेसबुकच्या या फीचरमुळे कोणीही असे टॅग केल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. परंतु फेसबुकने यासाठीही एक विशेष काळजी घेतली आहे. जर तुमचा फोटो प्रोफाईलमध्ये असेल तरच हे फिचर काम करणार आहे. त्यासाठी फोटो पब्लिक असणे गरजेचे असणार आहे. फोटो जर सर्वांना दिसत नसेल तर हे फिचर काम करणार नाही.