सावधान! फेसबुक न वापरणाऱ्यांचाही डेटा होतोय ट्रॅक

सामना ऑनलाईन। लंडन

फेसबुकवरुन आपल्या लाखो युजर्सचा खासगी डेटा ब्रिटीश फर्म कॅम्ब्रिज अॅनालिटीकाने लिक केल्याचे समोर आल्यानंतर फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग याने अजून एक खळबळजनक खुलासा केला आहे. ज्या व्यक्ती फेसबुक वापरत नाहीत त्यांचाही डेटा फेसबुक ट्रॅक करत असल्याचे झुकेरबर्गने सांगितले आहे. त्याच्या या विधानामुळे फेसबुक युजर्सच्या डेटा सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहीले आहे.

फेसबुकने आपल्या लाखो युजर्सचा खासगी डेटा कॅम्ब्रिज अॅनालिटीकला दिल्याचे गेल्या महिन्यात समोर आले होते. २०१६ साली अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना मदत व्हावी या उद्देश्याने ब्रिटीश फर्म कॅम्ब्रिज अॅनालिटीने फेसबुकवरील तब्बल ५ कोटी युझर्सची वैयक्तिक माहिती चोरली होती. हा डेटा लिक करण्यात आला होता. झुकेरबर्गनेच ती माहिती कॅम्ब्रिजला पुरवल्याचे कबूल केले होते.

बुधवारी एका कार्यक्रमादरम्यान अमेरिकेच्या प्रतिनिधी बेन लुजान यांनी डेटा लिकप्रकरणी झुकेरबर्ग यांना सवाल केला होता. जी लोकं फेसबुक वापरत नाहीत त्यांचाही डेटा फेसबुक ट्रॅक करत असताना तुम्ही मात्र डेटावर तुमचा कंट्रोल आहे हे कसं काय बोलू शकता असे तिने झुकेरबर्गला विचारले होते. बेन यांच्या या अनपेक्षित प्रश्नाने गोंधळलेल्या झुकेरबर्गने प्रश्नाचे उत्तर देणे टाळले. पण नंतर त्यांनी आपली चूक स्वीकारत कंपनी फेसबुक न वापरणाऱ्यांचाही डेटा ट्रॅक करत असल्याची कबुली दिली आहे.

फेसबुक न वापरणाऱ्या नॉन युजरर्सचा डेटा कंपनी नेटवर्क वापरणाऱ्या युजर्सकडूनच मिळवत असल्याचे यावेळी फेसबुकने सांगितले. ज्यावेळी एखादा मित्र आपल्या कुठल्याशा मित्राचा ईमेल अपलोड करतो. त्याचवेळी त्याची माहिती एका ब्राऊजरमध्ये स्टोर केली जाते. त्यानंतर फेसबुक त्याचा वापर इंटरनेटवर दुसऱ्या लोकांना ट्रॅक करण्यासाठी करत असल्याचं फेसबुकतर्फे सांगण्यात आलं आहे. जर युजर्स नेटवर सर्च करताना अशा साईटवर गेला जिथे फेसबुकचे ‘like’ आणि ‘share’ हे बटन उपलब्ध असतील. पण त्यांनी त्यावर टॅपही केल नाही तरी ब्राऊजरवर कुकीज ते इन्स्टॉल करत.ज्याचा वापर ब्राऊजिंग डेटासाठी केला जातो. याचा उपयोग त्यांनी फेसबुक सुरू करावं याच आमंत्रण देण्यासाठी केला जातो.