बीडमध्ये बनावट नोटांचा अड्डा उद्ध्वस्त!

सामना ऑनलाईन । बीड

बीड शहरात ५० आणि १०० रुपयांच्या बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा आज उद्ध्वस्त करण्यात आला. बीड पोलिसांच्या मदतीने मध्य प्रदेश पोलिसांनी ही कारवाई केली. यावेळी दीड लाखाच्या नोटांसह छपाईचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी आरोपी सय्यद शकुर शब्बीरला पोलिसांनी अटक केली आहे. बीड शहरातील गांधीनगर भागात आरोपी सय्यद शकुर याने पत्र्याच्या शेडमध्ये बनावट नोटांची छपाई कारखाना सुरू केला होता.

५० आणि १०० रुपयांच्या बनावट नोटांची छपाई करून आरोपी या नोटा मध्य प्रदेशात पाठवायचा. सय्यद शकुर शब्बीरला बलात्काराच्या गुह्यात शिक्षा झाली होती. शिक्षा भोगत असताना त्याची ओळख मध्य प्रदेशातील एका आरोपीशी झाली. यावेळी बनावट नोटा छापण्याची तयारी केली होती. बाहेर पडल्यानंतर त्याने हा उद्योग सुरू केला.