एटीएममधून निघाली २ हजाराची बोगस नोट

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

बॅकेच्या एटीएममधून खऱ्या नोटाच निघतात या समजाला धक्का देणारी घटना राजधानी दिल्लीमध्ये घडली आहे. दिल्लीच्या शाहीन बाग परिसरात असणाऱ्या एटीएममधून दोन हजार रुपयांची बोगस नोट एका व्यक्तीला मिळाली आहे. याप्रकरणी संबंधीत व्यक्तीने जवळच्या पोलीस स्थानकामध्ये तक्रार नोंदवली असल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.

एटीएममधून आलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटेची अर्धी बाजू कोरी आहे. ही नोट व्यवहारात वापरायची कशी? आणि खात्यातून वजा झालेले दोन हजार रुपये परत मिळवायचे कसे? असा प्रश्न संबंधित व्यक्तीपुढे उभा ठाकला आहे.