मुंबई सफारी :- समुद्र किनारे

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबईचे समुद्र किनारे हे पर्यटकांसाठी आकर्षण केंद्र असली, तरी स्थानिकासाठी हे हक्काचे रिलॅक्स होण्याचे ठिकाण आहे. समुद्राच्या पाण्यात मजा करायला, वाळूत बसून रिलॅक्स होण्यासाठी येथे सुट्टीच्या काळात पर्यटक हजेरी लावतात. समुद्रकिनाऱ्यावरील सुर्याचा अस्त होताना पाहणे हा देखील एक सुखद अनुभव असतो. त्यामुळे अशा काही मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांवर तुम्ही नक्कीच एकदा फेरफटका मारू शकता.

‘काही निवडक समुद्र किनारे’

१. मरीन ड्राईव्ह
क्वीन्स नेकलेस म्हणून ओळखला जाणारा रस्ता म्हणजे मरीन ड्राईव्ह. गिरगाव चौपाटीला लागूनच असल्यामुळे येथे सतत पर्यटकांची वर्दळ असते. मरीन ड्राईव्हला बसल्यानंतर तुम्हाला समुद्रातील लाटांची मजा अनुभवता येते.

marine-drive

२. गिरगाव चौपाटी
गिरगाव चौपाटी हा मुंबईतील सर्वात प्रसिद्ध समुद्र किनारा आहे. समुद्राच्या पाण्याचा आनंद उपभोगण्यासाठी, तसेच सुर्याचा अस्त होताना पाहण्यासाठी या चौपाटीवर पर्यटक प्रचंड गर्दी करतात.

girgaon-choupati

३. जुहू चौपाटी
विर्लेपार्लेला असणाऱ्या या चौपाटीला पर्यटक सर्वात जास्त भेट देतात. या चौपाटीचे वैशिष्ट्य म्हणजे येथे हमखास तुम्हाला सिनेकलाकार पाहायला मिळतील. याशिवाय बाजूलाच असलेले इस्कॉन मंदिरही तुम्हाला पाहता येऊ शकते.

juhu

४. वर्सोवा बीच
शांत व माणसांची गर्दी नसलेला समुद्र म्हणून वर्सोवा बीच ओळखला जातो. या चौपाटीवर तुम्हाला ताजे मासे विकत मिळतील.

varsova

५. अक्सा बीच
मालाडजवळच असलेला अक्सा बीच हे ही फिरण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. हा किनारा अतिशय स्वच्छ असल्याने येथे बऱ्याच चित्रपटाचे शूटींगही होतात.

aksa-beach

मुंबई सफारी :- ऐतिहासिक स्मारके

६. गोराई बीच
बीच म्हटल की, प्रचंड गर्दी. पण बोरीवलीजवळील गोराई बीच या सगळ्याला अपवाद आहे. हा अतिशय शांतताप्रिय बीच असून तुम्ही काही वेळ तिथे रिलॅक्स होऊ शकता.

gorai

७. दादर चौपाटी
ही चौपाटी दादर येथे असून नेहमीच येथे वर्दळ असते. या चौपाटीवरून वांद्रे वरळी सी लिंकही दिसतो.

dadar-chowpatty

८. मार्वे बीच
मालाडजवळील मार्वे बीच हे देखील फिरण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. मुख्य म्हणजे कमी रहदारी असलेला व शांतताप्रिय असल्याने हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे.

marve

९. बॅंडस्टँड
वांद्रेजवळील बँडस्टँड हा बीच फिरण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. या बीचलगतच अनेक सिनेकलाकारांचे बंगलेही आहेत.

band-stand

१०. मड आयलँड बीच
हा बीच मालाड जवळच असून हा बीचही मार्वे बीचप्रमाणे शांतताप्रिय आहे. हा बीच पार्टीसाठी प्रसिध्द असून या बीचवर सेलिब्रेटींच्या पार्टी होतात.

madh-island

मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील आपल्या पसंतीच्या समुद्रकिनाऱ्यांची माहिती आम्हाला नक्की कळवा. खाली दिलेल्या प्रतिक्रियेच्या बॉक्समध्ये टाइप करुन ही माहिती तुम्ही आमच्यासोबत शेअर करू शकता.