विषारी किटकनाशकांमुळे आणखी एका शेतकऱ्याचा मृत्यू

सामना ऑनलाईन । नागपूर

विषारी किटकनाशकांमुळे अकोल्यात आणखी एका शेतकऱ्याचा बुधवारी मृत्यू झाला आहे. अशोक रामकृष्णा दहिभुते असे त्या शेतकऱ्याचे नाव असून ते अकोट तालुक्यातील रहिवाशी होते. काही दिवसांपूर्वी अशोक त्यांच्या शेतात बेशुद्धावस्थेत आढळून आले होते. त्यानंतर त्यांना अकोल्याच्या जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना नागपूर येथील सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे बुधवारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आतापर्यंत राज्यात विषारी किटकनाशकांमुळे मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांचा आकडा ४३ वर पोहोचला आहे. तर १८०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांना विषारी किटकनाशकांमुळे त्रास झाल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.