रानडुकराच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू, मंठा तालुक्यातील पांगरी येथील घटना

70
file photo

सामना प्रतिनिधी, मंठा

जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील पांगरी वायाळ येथील शेतकरी शेतात काम करीत असताना डुकराच्या हल्ल्यात या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.

याप्रकरणी पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, पांगरी येथील शेतकरी विठ्ठल नंदू चव्हाण (55) यांचा मंगळवारी 11 जुन रोजी नायबराव वायाळ यांच्या शेतात मृत्यू झाला आहे. याबाबत गुलाब नंदु चव्हाण (रा. पांगरी वायाळ) यांनी बुधवारी 12 जून रोजी पोलीसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांचा भाऊ विठ्ठल नंदू चव्हाण हे मंगळवारी स्वतःच्या शेतात गेले होते. ते सायंकाळपर्यंत घरी आले नाहीत. म्हणून त्यांना शोधण्याकरिता गेलो असता नायबराव वायाळ यांच्या शेतात पाळूच्या खाली विठ्ठल चव्हाण मृतावस्थेत पडलेले आढळून आले. याप्रकरणी मंठा पोलिसांत अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. याबाबत फौजदार रमेश चव्हाण यांनी सांगितले की, मंठा ग्रामीण रुग्णालयात विठ्ठल चव्हाण यांचे शवविच्छेदन करण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या