मातीमोल भावामुळे मेथी रस्त्यावर फेकली

प्रातिनिधिक

सामना ऑनलाईन । नाशिक

मेथीला एक रुपया जुडी असा मातीमोल भाव मिळत असून, यातून साधा मजुरी खर्चही सुटणार नसल्याने हवालदिल झालेल्या निफाड तालुक्यातील चांदोरी येथील शेतकऱयाने आज पाचशे जुडय़ा रस्त्यावर फेकून देत संताप व्यक्त केला.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या काही दिवसांपासून मेथीची आवक वाढली आहे, ती तब्बल ८५ हजार जुडय़ांच्या घरात पोहोचल्याने भाव गडगडले आहेत. निफाडच्या गोदाकाठ परिसरात भाजीपाल्याचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन घेतले जाते. येथे सुमारे २० ते २५ एकरावर मेथी आहे. मात्र, मातीमोल भावामुळे अनेक शेतकऱ्यांनी त्यावर नांगर फिरविला आहे.