तत्त्वतः दिवाळी!

या सरकारला आमचा तत्त्वतः पाठिंबा आहे, पण लोकांचे, राज्याचे प्रश्न सोडवता फक्त राजकीय फायद्यातोट्याचेच हिशेब मंत्रालयात चालणार असतील तर हमीभावाचे आम्हालाही सांगता येत नाही. शेतकरी आज आनंदात आहे. त्यांचा आनंद द्विगुणित करा. तूर्त तो तत्त्वतः दिवाळी साजरी करील. त्या दिवाळीत विघ्न आणू नका. संप फुटला नाही, शेतकरी मोडला नाही, तर सरकार झुकले हाच या तत्त्वतः दिवाळीचा अर्थ आहे!

शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीला राज्य सरकारने तत्त्वतः मान्यता दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आंदोलन तूर्तास थांबले आहे. शेतकऱ्यांच्या एकजुटीचा हा विजय असून आम्ही त्यांच्या एकजुटीच्या वज्रमुठीचे मनापासून आणि ‘तत्त्वतः’ अभिनंदन करीत आहोत. पुणतांबा गावातून शेतकरी आंदोलनाची ठिणगी पडली. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आंदोलनाचा आक्रोश केला. संप आणि बंदच्या दणक्यानंतर सरकारने दडपशाहीचे प्रकार केले तरी शेतकरी एक राहिला व हाच सरकारचा सगळ्यात मोठा पराभव ठरला. नव्या ‘घोषणे’नुसार अल्पभूधारकांचे कर्ज तत्काळ माफ झाले आहे व सरसकट कर्जमाफीस ‘तत्त्वतः’ मान्यता देऊन सरकारने स्वतःच्या गळय़ाभोवतीचा फास सोडवून घेतला आहे. शेतकरी आंदोलनात शिवसेनेचा संपूर्ण सहभाग होता. त्यामुळे आंदोलन तीव्र झाले व ते इतके तीव्र झाले की, जणू सरकारचा गळाच आवळला गेला. शेतकऱ्यांचे प्राण वाचविण्यासाठी एकतर सरसकट कर्जमाफी करा नाहीतर गुदमरून मरा हाच शिवसेनेचा संदेश आहे. सरसकट कर्जमाफीच्या प्रश्नावर शिवसेनेच्या मंत्र्यांनी ‘कॅबिनेट’वर बहिष्कार टाकून हाच इशारा दिला होता. जर तुम्ही शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे प्राण असेच घेणार असाल तर तुमच्याशी आमचं जमणार नाही व

तुमच्या पापात

आम्हाला सहभागी व्हायचे नाही ही आमची रोखठोक भूमिका आहे आणि राहणार. आम्ही आता मुख्यमंत्र्यांचे फक्त एकाच गोष्टीसाठी अभिनंदन करीत आहोत ती म्हणजे कर्जमाफी केली तरी शेतकरी आत्महत्या करणार नाहीत याची ‘हमी’ कुणी देईल काय? असा प्रश्न त्यांनी केला नाही. आता ‘कुणी’ याचा अर्थ ‘तत्त्वतः’ शिवसेना व इतर संघटना असाच घ्यायला हवा. आमच्याकडून व शेतकऱ्यांकडून असे कोणतेही हमीपत्र लिहून न घेता मुख्यमंत्र्यांनी सरसकट कर्जमाफी जाहीर केल्याबद्दल हे अभिनंदन आहे. अर्थात सरकारने ही कर्जमाफी मोकळ्या मनाने व दिलदारीने दिलेली नाही. सरकारात राहून रोज याप्रश्नी शिवसेनेने लाथा घातल्याचा हा परिणाम आहे. शिवसेना सरकारात का? या प्रश्नाचेही नेमके उत्तर हेच आहे. शिवसेना सरकारात फक्त खुर्च्या उबवायला बसलेली नाही, तर जे लोक खुर्च्या उबवून अंड्यांची पैदासही करीत नाहीत अशांच्या खुर्च्या हलवायला बसली आहे. अर्थात उद्याची ‘हमी’ काही आम्ही देऊ शकत नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीस तत्त्वतः वगैरे मान्यता दिली तशी तत्त्वतः स्थगिती समृद्धी महामार्गास दिली असती तर आम्ही मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन तोफांच्या सलामीने केले असते. मुख्यमंत्र्यांनी ती संधी राज्याच्या शेतकऱ्यांच्या वतीने द्यावी अशी आम्ही त्यांना ‘तत्त्वतः’ विनंती करीत आहोत. सरकारात एखादे

काम रेंगाळत ठेवायचे असेल तर

आयोग वगैरे नेमून त्यांच्या अहवालावर वर्षानुवर्षे धुळीचे थर साचवले जातात. तसे अनेकदा ‘तत्त्वतः’ या सरकारी शब्दप्रयोगाचे झाले आहे. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी ‘तत्त्वतः’ शब्दाच्या रेशमी फासात अडकून पडू नये. नाहीतर विश्वासघात व उपेक्षेच्या भडक्यात सरकार होरपळून निघेल. तत्त्वतः कर्जमाफीचे निकष सरकारने तत्काळ जाहीर करावेत. फडणवीस सरकारच्या काळात ज्या चारेक हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांचेही सातबारा कोरे करकरीत व्हावेत. शेतकऱयांच्या मालास हमीभाव मिळावा या मागणीचा रेटा आम्हाला सोडता येणार नाही. या आमच्या मागण्या तत्त्वतः नसून आरपारच्या आहेत. शेतकऱ्यांच्या तोंडास पुन्हा पाने पुसण्याचा प्रयत्न झालाच तर गाठ शिवसेनेशीच आहे व शिवसेना आग्या वेताळाच्या भूमिकेत शिरून पुन्हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. या सरकारला आमचा तत्त्वतः पाठिंबा आहे, पण लोकांचे, राज्याचे प्रश्न न सोडवता फक्त राजकीय फायद्या-तोटय़ाचेच हिशेब मंत्रालयात चालणार असतील तर ‘हमी’ भावाचे आम्हालाही सांगता येत नाही. शेतकरी आज आनंदात आहे. त्यांचा आनंद द्विगुणित करा. तूर्त तो तत्त्वतः दिवाळी साजरी करील. त्या दिवाळीत विघ्न आणू नका. संप फुटला नाही, शेतकरी मोडला नाही, तर सरकार झुकले हाच या तत्त्वतः दिवाळीचा अर्थ आहे!

 • Dhondu Dafare

  आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय अशी एक म्हण आहे मराठीत. ह्यांच्या बापाचे काय जाते पैसे वाटायला? स्वतःच्या खिशातून जात आहेत का? लोक कर भरणार आणि हे फुकट वाटत बसणार.

 • ST_Nationalist

  Uddhav Khambata chya deal madhe milalela paisa shetkaryana watnar aahe ka?

 • Satish Madhekar

  राऊत आणि उद्धट हे दोन य. झ. काळू-बाळू अत्यंत माजले आहेत. दोघेही मूर्खांसारखे बरळत असतात. उद्धट लंडनला जाऊन मजा करतोय आणि हा इथे मालकावरच भुंकतोय. जेवहा शिटसेनेला महाराष्ट्रात कोणी हिंग लावून विचारात नव्हते, तेव्हा भाजपने त्यांना स्वतःच्या खांद्यावर घेऊन मोठे केले. भाजपचे उपकार विसरून हे साप आज भाजपलाच चावत आहेत.

  भाजपने शिटसेनेचा नालायकपणा ओळखूनच केंद्रात फक्त १ फालतू मंत्रीपद दिले आहे तर राज्यात बिनमहत्त्वाची ५-६ मंत्रीपदे दिली आहेत. रालोआच्या घटकपक्षांच्या बैठकीला देखील शिटसेनेला बर्‍याचदा निमंत्रण दिले जात नाही. कोणत्याही निर्णयात शिटसेनेला सहभागी करून घेतले जात नाही. इतके अपमान सहन करून व भाजपकडून इतकी अवहेलना सहन करूनसुद्धा सत्तेला हपापल्याने शिटसेना मंत्रीमंडळात टिकून आहे.

  पूर्वी तमाशात काळू-बाळू ही विनोदी जोडी प्रसिद्ध होती. राऊत आणि उद्धट ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील काळू-बाळू आहेत. दोघेही अत्यंत मूर्खासारखे अर्वाच्य व विनोदी बरळून महाराष्ट्राची करमणूक करीत असतात. वास्तविक पाहता महाराष्ट्राच्या जनतेनेचे सर्व निवडणुकात शिटसेना व शिटसेनेच्या उमेदवारांच्या पेकाटात लाथ घालून त्यांना पराभूत करून भाजपला विजयी केले आहे. पण यांचा माज व मूर्खपणा कायम आहे. शिटसेना हा निर्लज्ज, कॄतघ्न व लाचारांचा पक्ष आहे. भाजपने शिटसेनेला मोठे केले, पण हे कृतघ्न भाजपवरच भुंकत असतात व भाजपने डोळे वटारले की दोन्ही पायात शेपूट घालून पळून जातात.

 • Rasik Lal

  उद्धव व राऊत यांच्या गांडीवर लाठ्या घाला. यांनी काहीही केलेले नाही.

  शिवसेनेला घाबरून अथवा त्यांनी भीती दाखवली म्हणून सरकारने कर्जमाफी दिली नाही, सरकारची भूमिका ही शेतकऱ्यांना न्याय देण्याची होती म्हणूनच आम्ही राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला असल्याचे स्पष्टीकरण महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज केले. शिवसेनेने सरकारने आपल्याला घाबरूनच कर्जमाफी घेण्याचा निर्णय घेतला असल्याचा दावा काल केला होता तो दावा पाटील यांनी खोडून काढला.

 • zankya

  लाचाराची आक्रमकता हा लेख वाचला आणि अगदी बरोबर वाटले कि लाचार शिवसेना उरलेसुरले बळ एकवटून आक्रमकता दाखवू पहाते आहे? पण कशासाठी आणि कोणाविरुद्ध याचे ताळतंत्र त्यांना अजिबात नाही. शिवसेना हा मराठी अस्मिता जपणारा पक्ष असे मला वाटत होते पण आता हाच पक्ष मढयाच्या टाळूवरचं लोणी खाणारा पक्ष झाला आहे.
  दुर्दैव असे कि त्यांच्या या अशा वागण्याने (भुंकण्याने) जनमानसात त्यांची प्रतिमा परत उंचावेल असा त्यांनी गोड गैरसमज करून घेतला आहे. पण त्यांचे हे असे दुट्टप्पी, कर्तव्यशून्य वागणे म्हणजे स्वतःच स्वतःसाठी चिता रचण्यासारखे आहे. मराठी माणसांच्या दुर्दैवाने एकेकाळचा भरोश्याचा पक्ष काही वर्षात नामशेष होईल. आणि याला कारण फक्त आणि फक्त दिशाहीन आणि भरकटलेले नेतृत्व