कल्याण-नगर महामार्गावर शेतकर्‍यांचा रास्ता रोको

49

मोहने – कल्याण तालुक्यातील रायते येथील शेकडो शेतकर्‍यांनी आज रास्ता रोको आंदोलन करून कल्याण-नगर महामार्ग रोखून धरला. या महामार्गाच्या चौपदरीकरणास जमीन देण्यास ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला असून भविष्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. या आंदोलनामुळे महामार्गावर वाहतुकीची मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
कल्याण-नगर या २२२ क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू असून ठिकठिकाणी भूसंपादन केले जात आहे. या चौपदरीकरणास विरोध नसला तरी यासाठी संपादित केल्या जाणार्‍या सुपिक जमिनीच्या संपादनास विरोध असल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. मात्र असे असताना शेतकर्‍यांना विश्‍वासात न घेताच भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
यापूर्वी २००६-०८ मध्ये गेल इंडिया, रिलायन्स, भूसंपादन केले आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ (हाय टेन्शन) या तीन प्रकल्पांसाठी भूसंपादन बडोदा (गुजरात) एक्स्प्रेस महामार्ग, टिटवाळा या शहरात पाणीपुरवठा करणारी लाईनसुद्धा गेली आहे. यामुळे शेकडो एकर जमीन भूसंपादन केली, परंतु त्याचा शेतकर्‍यांना फायदा झाला नाही. आमचा विकास कामासाठी विरोध नाही. परंतु बारमाही पीक देणारी आमची हक्काची जमीन गेल्याने उदरनिर्वाह कसा करणार? त्यासाठी आम्ही विरोध करीत आहोत. पूर्वी राष्ट्रीय महामार्ग २२२ या जुन्या महामार्गावरून रुंदीकरण केले तर आमच्या जमिनी वाचतील असा या ग्रामस्थांचे म्हणणे आहे. दरम्यान, आज सकाळी ९ भूसंपादन अधिकारी घटनास्थळी येताच शेतकर्‍यांनी थेट रस्त्यावरच ठाण मांडत रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली.

आपली प्रतिक्रिया द्या