कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

सामना प्रतिनिधी । लातूर

निलंगा तालुक्यातील मौजे उस्तुरी येथील शेतकरी अशोक झटिंगा गायकवाड 55 वर्षे या अल्पभूधारक शेतकऱ्याने खासगी सावकाराच्या कर्जाला व सरकारी कर्जाला कंटाळून शेतातील सोयाबिन या पिकावर फवारण्यासाठी आणलेले विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.

अशोक झटिंगा गायकवाड यांनी दि. 5 सप्टेबर 2018 रोजी विषारी औषध प्राशन केले होते. अशोक यांना उपचारासाठी लातूर येथील शासकीय दवाखान्यात दाखल केले होते. त्यांना वाचविण्यात डॉक्टरांना यश आले नाही. उपचारादरम्यान दि 10 सप्टेबर 2018 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले, भाऊ बहीण असा परिवार आहे.