अजून किती शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची वाट बघणार?

यवतमाळ जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराज सन्मान कर्ज योजना व प्रोत्साहन भत्ता प्रलंबित असून सर्वांधिक आत्महत्या या जिल्हात झाल्या आहेत. सरकार अजून किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या करण्याची वाट बघत आहे, असा संतप्त सवाल प्रश्नोतराच्या तासाला उपस्थित करत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारला फैलावर घेतले.

छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनाव प्रोत्साहन भत्ता अनुदान शेतकऱ्यांना कधी देणार, अजून किती शेतकऱ्यांची आत्महत्या करण्याचे सरकार वाट बघणार तसेच ज्यांची कर्जमाफी झाली नाही त्यांना कधीपर्यंत कर्जमाफी देणार असा सवाल दानवे यांनी केला.