ठुस्सूक, ठुस्सूक करून त्रास दिला, सहकाऱ्याकडे मागितली 12 कोटींची नुकसान भरपाई

36

 सामना ऑनलाईन । सिडनी

ऑस्ट्रेलियामध्ये एका इंजीनिअरने आपल्या सुपरवायजरवर विचित्र आरोप केला आहे. कामादरम्यान सुपरवायजर आपल्या तोंडाजवळ पादायचा असा आरोप या इंजीनिअरने केला आहे. तसेच यामुळे आपला मानसिक छळ झाल्याचेही इंजीनिअरने  म्हटले आहे.

डेविड हिंग्स्ट असे तक्रारदाराचे नाव असून ग्रेग शॉर्ट असे सुपरावायजरचे नाव आहे. ग्रेग शॉर्ट असे दिवसातून पाच ते सहा वेळा करायचा जेणेकरून आपण नोकरी सोडवी, असा आरोप डेविडने केला आहे. या प्रकरणी डेविडने न्यायालयात कंपनीवर 12  कोटींची नुकसान भरपाईची मागणी केली होती.

परंतु यात कुठल्याच प्रकारचा मानसिक त्रास दिला नसल्याचा निकाल न्यायालयाने दिला होता. डेव्हिडने या निर्णयाविरोधात वरिष्ठ न्यायालयात दाद मागितली.

आपल्या सुपवरवायजरच्या अशा वागण्यामुळे आपल्याला खूप मानसिक त्रास झाल्याचे डेव्हिडने म्हटले. डेव्हिड म्हणाला की, “मी जेव्हा भिंतीकडे तोंड करून बसायचो तेव्हा ग्रेग माझ्या केबीनमध्ये यायचा आणि गॅस सोडून जायचा. ती केबिन खूपच लहान होती, त्या केबीनमध्ये एकही खिडकी नव्हती. ग्रेग असे दिवसांतून पाच ते सहा वेळा करत असे.”

ग्रेगने हे आरोप फेटाळले आहे. आपण असे एक दोनदा केलेही असेल परंतु त्यामागे डेव्हिडला छळण्याचा हेतु नसल्याचे ग्रेगने म्हटले आहे. ऑस्ट्रेलियाच्या सर्वोच्च न्यायालयाने गॅस सोडणे ही गंभीर बाब नसल्याचे म्हटले आहे. या खटल्याचा निकाल २९ मार्च रोजी सुनावण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या