हा त्यांच्या बापाचा देश आहे काय?

सामना ऑनलाईन, श्रीनगर

मुस्लिमांनी हिंदुस्थानात राहू नये असे वक्तव्य भाजपनेते विनय कटियार यांनी केले होते. त्यांच्या वक्तव्याला जम्मू- कश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी प्रत्युत्तर दिले आहे. हा देश त्यांचा बापाचा आहे काय असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे. हा देश कोणाच्याही बापाचा नसून हा माझा देश आहे. हा सर्वांचा देश आहे. ज्यांच्या मनात पराकोटीचा द्वेष आहे तेच अशी भाषा करतात अशी टीकाही त्यांनी केली आहे.

खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी हिंदुस्थानात राहणाऱया मुस्लिमांना ‘पाकिस्तानी’ म्हणून हिणवणाऱयांना तीन वर्षांचा तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा व्हावी यासाठी सरकारने कायदा करावा अशी मागणी केली होती. त्यावर मुस्लिमांनी या देशात राहू नये असे प्रत्युत्तर कटियार यांनी दिले होते. आता कटियार यांच्यावर फारुख अब्दुल्लांनी हल्लाबोल केला आहे. त्यामुळे हा वाद वाढण्याची शक्यता आहे.