faशन paशन

ओमप्रकाश शिंदे

आवडती फॅशन –  कॅज्युअल शर्ट्, ब्ल्यू जीन्स, स्निकर शूज.

फॅशन म्हणजे – आपल्याला जे कम्फर्टेबल वाटतं. आपली दिनचर्या कशी आहे, त्यासाठी जे योग्य वाटेल ते.

व्यक्तिगत आयुष्यात कशाप्रकारचे कपडे घालण्यास प्राधान्य देता? – कॅज्युअल्स जीन्स-शर्ट.

फॅशन म्हणजे केवळ कपडे की?- नाही. फॅशन म्हणजे तुमचे व्यक्तिमत्त्व. तुम्ही त्यातून काय दाखवता ते.

आवडती हेअरस्टाईल?- शॉर्ट हेअर आवडतात. ‘लक्ष्मी मालिकेतील लूक आहे तो आवडतो.

फॅशन जुनी की नवी?- दोन्ही करतो. असे काही ठरवलेले नसते. कधीतरी जुन्या स्टाईलचे कपडे घालायलाही आवडतात. कधीतरी शिवूनही घेतो. नवीन तर घेतच असतो.

आवडता रंग? पांढरा आणि काळा.

तुझ्या माणसांना तुझी कोणती फॅशन आवडतात? जवळच्यांना खरंतर कसाही आवडतो. पांढरा शर्ट, पांढऱया कपडय़ांमध्ये आवडतो.

स्ट्रिट शॉपिंग आवडते का? – स्ट्रिट शॉपिंग फारशी केलेली नाही, पण ऑनलाइन शॉपिंग जास्त करतो. कारण वेळही जायला मिळत नाही.

कोणत्या गोष्टीवर जास्त खर्च करता ?- ऑनलाइन शॉपिंग

ज्वेलरीमध्ये काय आवडते? घडय़ाळं, ब्रेसलेट

आवडता ब्रॅण्ड- यूजटिगी

फॅशन फॉलो कशी करता? – इन्स्टाग्रामवर पेजेस असतात. ते फॉलो करतो.

फॅशनबाबत अपडेट राहण्यासाठी? – खरतरं मी काही फॅशन फॉलो करायचो नाही. पण मालिकेमुळे मयुरी आणि अभिज्ञामुळे करायला लागलो त्या खूप फॅशन फ्रिक दोघी आहेत. त्यांनी मला फोर्स करून करून सवय लावली. कुठल्याही इव्हेण्टसाठी मी तयार होत असेन त्यांना फोटो वगैर पाठवतो. त्या सजेस्ट करत असतात. त्यामुळे अपडेट राहत असतो.

ब्युटी सिक्रेट- आनंदी राहणे.

टॅटू काढायला आवडेल का?- नाही, अजून तरी काही काढलेला नाही आणि काढायचा विचारही नाही. कायमस्वरूपी शरीरावर असे काही आवडत नाही. स्वातंत्र्य फार आवडतं.

तुमच्या बॅगेत हमखास आढळणाऱया तीन गोष्टी- हेअर प्रोडक्ट, ग्लेअर्स, छोटसं नॉमिल मेकअप किट.

फिटनेससाठी…पुरेपुर झोप आणि वेळच्यावेळी खाणे.