मस्त स्कर्टस्

वंदना चौबळ, फॅशन डिझायनर

सगळ्यांपेक्षा आपण वेगळं दिसावं, आकर्षक दिसावं अशी प्रत्येक तरुणीची इच्छा असते. यासाठी अलीकडे स्कर्ट परिधान करण्याची नवीच फॅशन उदयाला आली आहे, कारण या पेहरावामुळे तरुणी जास्त आकर्षक दिसू शकतात. आजकाल अशा वेगळ्या प्रकारचे आणि खास स्कर्टचे आऊटफिट बाजारात मिळू लागले आहेत. यामुळे तरुणी वेगळ्या आणि स्टायलिश वाटतात.

कोणता स्कर्ट निवडाल?

> आपल्या बॉडी टाईपनुसार स्कर्ट निवडला पाहिजे. ए-लाइन स्कर्ट इंग्रजीतील ‘ए’ या अक्षरासारखा असतो. स्लीम वेस्ट लाइन अशा टाईपचा असल्याने सरळ बांधा असलेल्या मुलींना हा स्कर्ट छान दिसेल.

> स्ट्रेट स्कर्ट म्हणजे एक सरळ आणि लांब आकाराचा स्कर्ट असतो. स्कर्टच्या या पॅटर्नचे वैशिष्टय़ असं की तो कोणत्याही आकाराच्या बॉडी टाईपवर छानच दिसतो. यात शॉर्टस, नी-लेंथ, फुल लेंथ, मिड लेंथ, एंकल लेंथ असे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत.

> फ्लेअर्ड स्कर्ट ए-लाइनच्या स्कर्टसारखाच असतो. पण त्याच्या खाली फ्लेअर्स असतात. ज्यांची कंबर मोठी असते अशा मुलींनी स्कर्टचा हा पॅटर्न निवडायला हवा. पियर आणि ऍपल शेप बॉडी फिगरच्या मुलींनी नेहमी घेर असलेला स्कर्ट परिधान करायला हवा. स्कर्ट कंबरेला फिट्ट बसला पाहिजे.

> पेंन्सिल स्कर्ट या टाईपचा हा स्कर्ट बहुतांश स्ट्रेचेबल किंवा रिंकल फॅबरिकमध्ये मिळतो. या स्कर्टची लांबी गुडघ्यांच्या वर असते. ज्या मुलींची कंबर छोटी असते त्यांना हे स्कर्ट छान दिसतात.

आकर्षक ड्रेस

> स्कर्ट घातल्यामुळे तरुणी उंच आहे असं वाटू शकतं. त्यामुळे तिला एक कम्पलिट लुक मिळतो. या परिधानामुळे आपण छान दिसतोय हा रिलॅक्स फिलही तरुणींना आणखी आकर्षक बनवतो. सध्या हिवाळा सुरू झाला आहे. पण अशा प्रकारचा ड्रेस उन्हाळ्यात जास्त रिलॅक्स फिल देतो.

> स्कर्ट अलीकडे बहुतांश अभिनेत्रींनी घातलेला दिसतो. या अभिनेत्री सिनेमाच्या बाहेरही फंक्शन्समध्ये अशा प्रकारचे सूट घालतात. त्यामुळे त्या आकर्षक दिसतात.

> अलीकडे फुलाफुलांचे डिझाईन्स असलेले स्कर्ट जास्त प्रचलित आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या स्कर्टस्वर फुले आणि वेगवेगळे रंग यूज केलेले दिसतात. हिवाळ्यातही मुलींना फुलांचे आणि रंगांचे डिझाइन्स असलेले स्कर्टस् खूप आवडतात.

> स्कर्टमध्ये लाँग आणि शॉर्ट अशा दोन्ही प्रकारचे कपडे छान वाटतात. या सूटमध्येही प्रिंटेड स्कर्ट आणि प्लेन कुर्ती यांचे कॉम्बिनेशन उठून दिसते.