Fa शन Paशन

गश्मीर महाजनी

फॅशन म्हणजे ऍटिटय़ूड

फॅशनची व्याख्या…फॅशन म्हणजे कम्फर्ट. जे घातल्यावर आपल्याला आनंद मिळेल, आपण त्यात स्वतःला कम्फर्ट समजू.

व्यक्तीगत आयुष्यात कशाप्रकारचे कपडे घालण्यास प्राधान्य देता?…मला विशेषता कॅज्युअल कपडे घालायला आवडता. त्यामुळे कुठेही जाताना कॅज्युअल मला जास्त सोईचे वाटते.

फॅशन म्हणजे केवळ कपडे की? ः फॅशन म्हणजे फक्त ऑटिटय़ूड. तुमच्या कपडय़ांबरोबरच ऍटीटय़ूडही तितकाच महत्वाचा असतो.

आवडती हेअरस्टाईल?…शॉर्ट हेअर.

 फॅशन जुनी की नवी?…ते तुमच्या ऑटिटय़ूडवर अवलंबून असते. फॅशन सतत बदलत जाते, त्यातून तुम्ही स्वतःला कसे कॅरी करता ते महत्वाचे असते. एखाद्या दिवशी मी रिलॅक्स असेन तेव्हा कॅज्युअल घालतो, एखाद्या दिवशी छान ड्रेसअप घालायचा मूड असेल तेव्हा ड्रेसअप करुन जातो.

आवडता रंग? पांढरा

तुझ्या माणसांना तुझी कोणती फॅशन आवडते…माझ्या बायकोला पारंपारिक पोशाखात आवडतो.

स्ट्रिट शॉपिंग आवडते का? नाही.

कोणत्या गोष्टीवर जास्त खर्च करता ?- तांत्रिक गोष्टींवर.

ज्वेलरीमध्ये काय आवडते?- घडय़ाळ

आवडता ब्रॅण्ड…डॉल्से ऍण्ड गॅबाना (डीजी)

 फॅशनबाबत अपडेट राहण्यासाठी?…जगभरातले सिनेमे पाहतो.

तुमच्या बॅगेत हमखास आढळणाऱया तीन गोष्टी- ट्रिमर, गाडीची चावी, हेअर प्रोडक्ट

फिटनेससाठी… घरचे जेवण