फॅशन म्हणजे आत्मविश्वास

2

आशुतोष कुलकर्णी

 तुझी आवडती फॅशन – कॉटन ट्राऊजर आणि कॉटनचे शॉर्ट कुर्ते किंवा शर्ट.

 फॅशनची व्याख्या फॅशन म्हणजे आत्मविश्वास. आत्मविश्वासाने आपण जे काही घालतो ती स्टाईलच असते. तुमचा आत्मविश्वास महत्वाचा ठरतो.

व्यक्तिगत आयुष्यात कशाप्रकारचे कपडे घालण्यास प्राधान्य देता? – साधे, सुटसुटीत आणि त्या वातावरणाला सुट होतील असे.

फॅशन म्हणजे केवळ कपडे की? – नाही, त्यावर काय ऍक्सेसरीज घालतो तेही तितकेच आवश्यक आहे.

आवडती हेअरस्टाईल? – साधी, सोबर

 फॅशन जुनी की नवी? – जुनी नवी अशी काही नाही. मला दोन्ही मिक्स करायला आवडते. मिक्समॅच करुन म्हणू शकता.

आवडता रंग? – मोरपिशी

 तुमच्या जवळच्यांना तुमची कोणती फॅशन आवडते? – शॉर्ट कुर्ता आणि कॉटन जिन्स.

स्ट्रिट शॉपिंग आवडते का? – नाही

कोणत्या गोष्टीवर जास्त खर्च करता? – शूज.

 ज्वेलरीमध्ये काय आवडते? – कडं

आवडता ब्रॅण्ड यु.बी.सी., खादी

फॅशन फॉलो कशी करता?- मी ठरवतो. मला जे आवडते ती माझ्यासाठी फॅशन. पण ते प्रसंगानुरुप ठरवतो.

फॅशनबाबत अपडेट राहण्यासाठी? – काहीच विशेष नाही. ओळखीच्या फॅशन डिझायनरसोबत चर्चा करतो. त्यातून नवीन फॅशन कळते.

ब्युटी सिक्रेट इट हेल्थी ऍण्ड स्टे हॅप्पी

टॅटू काढायला आवडेल का? – नाही

तुमच्या बॅगेत हमखास आढळणाऱया तीन गोष्टी परफ्युम, ट्रिमर आणि पाणी

फिटनेससाठी डोकं शांत ठेवणे आणि नियमित व्यायाम.