फॅशन म्हणजे आत्मविश्वास

अमृता खानविलकर

फॅशनची व्याख्या…ती सतत बदलत असते. त्याप्रमाणेच स्वतःला ठेवण्याचा प्रयत्न असतो. फॅशन म्हणजे थोडे वेगळे, हटके आणि ज्यामध्ये आपण कम्फर्टेबल आहोत असेच कपडे.

व्यक्तिगत आयुष्यात कशा प्रकारचे कपडे घालायला प्राधान्य देतेस?…तसे सगळ्या प्रकारचे कपडे घालायला आवडतात. पण त्यात विंटेज ड्रेस प्रचंड आवडतात.

फॅशन म्हणजे केवळ कपडे की आणखी काही?…आपला आत्मविश्वास.

आवडती हेअरस्टाईल?…मोकळ्या केसांपेक्षा बांधलेले केस आवडतात.

फॅशन जुनी की नवी?…आता नवे-जुने असे काही राहिलेले नाही. जुनी फॅशन नव्याने येतेय. त्यामुळे आपण करू ती फॅशन आहे.

आवडता रंग?…काळा, पांढरा. प्राथमिक रंग.

तुझ्या जवळच्यांना तुझी कोणती फॅशन आवडते…साडी. माझ्या नवऱयाला मी साडीत आवडते आणि सगळ्यांचेच म्हणणे आहे की साडीत सुंदर वाटते.

स्ट्रीट शॉपिंग आवडते का?…हो प्रचंड. म्हणजे काही ठरावीक इव्हेंट सोडले तर बाकीसाठी मी स्ट्रीट शॉपिंगच करते.

कोणत्या गोष्टीवर जास्त खर्च करतेस?…दागिने आणि शूज.

दागिन्यांमध्ये काय आवडते?…सोन्याचे दागिने.

आवडता ब्रॅण्ड…ठरवून असा कोणताच नाही.

फॅशन फॉलो कशी करतेस?…आज अनेक माध्यमं आहेत. पण सोशल साईट्सच्या माध्यमातून फॅशन फॉलो करते. जगभरातली फॅशन पाहायला मिळते.

फॅशनबाबत अपडेट राहण्यासाठी?…माझ्या काही मैत्रिणी आहेत, त्या कमालीच्या स्टाईल करतात. त्यांना फॉलो करते. एक चांगली स्टायलिस्ट हायर करणं हल्लीची गरज झालेली आहे. स्टायलिस्टमुळे आपल्याला कपडय़ांबाबत मोठी स्पेस मिळालेली आहे.

ब्युटी सिक्रेट…नियमित व्यायाम.

टॅटू काढायला आवडेल का?…हो. मी तीन टॅटू काढले आहेत.

बॅगेत हमखास आढळणाऱया तीन गोष्टी…वॉलेट, जपमाळ आणि मोबाईल-इअरफोन.