विचार म्हणजे फॅशन

प्रार्थना बेहरे

फॅशनची व्याख्या…जे तुम्हाला शोभतं, चांगलं वाटतं ती फॅशन. त्यात तुम्ही कम्फर्टेबल असता. इतरांनी घातले म्हणून तसे कपडे आपण घालावेत असे करू नका. इतरांनी केलेली फॅशन आपल्याला चांगली दिसेलच असे नाही.

व्यक्तिगत आयुष्यात कशा प्रकारचे कपडे घालतेस?…पुन्हा सांगेन की मला जे शोभून दिसते, त्या प्रकारचे कपडे मी घालते. जरी तसे कपडे फॅशनमधले असले तरी आऊट ऑफ द बॉक्स जाऊन काही करायला आवडत नाही.

फॅशन म्हणजे केवळ कपडे की…?…फॅशन म्हणजे केवळ कपडे नाहीत तर सगळं काही… तुमचे विचार, तुमचा दृष्टीकोन, तुमची स्टाईल करण्याची पद्धत हे सगळं त्यात आलं.

आवडती हेअरस्टाईल?..मोकळे केस, कर्ल्स

फॅशन जुनी की नवी?…जुन्या फॅशन नव्याने आल्या आहे. फॅशन रिपीट होत असते. त्यामुळे जुनी फॅशन मला आवडते.

आवडता रंग?…काळा, पांढरा

तुझ्या जवळच्या माणसांना तुझी कोणती फॅशन आवडते…शॉर्ट ड्रेसेस. सगळ्यांचे म्हणणे असते की मला शॉर्ट ड्रेसेस चांगले वाटतात, शोभून दिसतात.

स्ट्रीट शॉपिंग आवडते का?- कॉलेजमध्ये असताना प्रचंड करायचे. वांद्रे लिंकींगवरुन भरपूर शॉपिंग करायचे. पण आता करत नाही.

zकोणत्या गोष्टीवर जास्त खर्च करतेस?…कपडे आणि शूज

फॅशन फॉलो कशी करतेस?…मला जर शोभणारे असेल तर ते फॉलो करते नाहीतर नाही.

फॅशनबाबत अपडेट राहण्यासाठी?…सोशल मिडीयाच्या माध्यमातून अपडेट असते. तसेच सगळ्या फॅशन ब्रॅण्ड्सना इन्स्टाग्रामवर फॉलो करते.

ब्युटी सिक्रेट…जस्ट बी हॅप्पी. आनंदी असल्यावर ते तेज चेहऱयावर दिसते आणि तुम्ही आपसुकच सुंदर दिसायला लागता.

टॅटू काढायला आवडेल का?…हो मी आधीच तीन टॅटू काढले आहेत आणि लग्नानंतर आणखी एक चौथा टॅटू काढला.

तुझ्या बॅगेत हमखास आढळणाऱया तीन गोष्टी…लिपस्टिक, परफ्युम, आणि मिंट.

 फिटनेससाठी…भरपूर पाणी प्या. व्यायाम मला आवडत नाही, पण वॉक घेणे, स्विमिंग यातून मी स्वतःला कार्यक्षम ठेवते.