रंगीबिरंगी दागिने

कॉलेज तरुण म्हटले की फॅशन आलीच…. नेहमीपेक्षा या तरुणांकडे काहीतरी वेगळे पाहायला मिळते. थोडसं इतरांपेक्षा वेगळं, भन्नाट आणि थोडं फंकी कॉलेज तरुणांमध्ये पाहायला मिळते आणि त्यांच्यापासूनच फॅशन सुरू होते. सध्या कॉलेज तरुणींमध्ये फंकी इअरिंग घालण्याचे प्रमाण वाढलेय. सध्या कोणता ट्रेण्ड आहे ते आपण जाणून घेऊया. नटण्याची हौस कोणाला नाही असे होणारच नाही. सगळ्यांनाच नटायला आवडते. पण अलिकडे कॉलेज  तरुणींमध्ये इअरिंगची जाम फॅशन चालू आहे. जीन्स टीशर्ट घालायचे आणि त्यावर रंगीबेरंगी कानातले घालायचे. भन्नाट लूक वाटतो.

बिडेड ज्वेलरी
जुन्या काही खेळण्यांचे वेगवेगळे मणी, रंगांचे बिड्स, लहान ठोकळे आणि मेटल यापासून तयार करण्यात आले आहेत. वेगवेगळ्या रंगाचे मणी मस्त शोभून आणि वेगळे वाटतात. या मण्यांचे कानातले, नेकलेस वेगळे आणि भन्नाट वाटतात.

हार्ट स्टड इअरिंग
तरुणींमध्ये स्टड खूप प्रसिद्ध आहेत. ज्यांना लटकते कानातले आवडत नसतील अशांसाठी स्टड बेस्ट पर्याय आहे. शिवाय काळ्या रंगामध्ये गुलाबी रंगाचे लिटल हार्ट अगदी वेगळे वाटतायत. त्यामुळे कॅज्युअल्सवर स्टड हटके वाटतील.

क्युब फंकी इअरिंग
काहीतरी वेगळे नवीन घालायला आवडत असेल तर क्युब फंकी इअरिंग घालायला हरकत नाही. हे रंगीबिरंगी क्युब तुमचं व्यक्तीमत्व आणखी खुलवतं आणि वेस्टर्न आणि इंडियन अशा दोन्ही लूकवर शोभून दिसते.

रंगीत ओवल इअरिंग
गडद रंगांची ज्वेलरी घालण्याची आवड असलेल्या तरुणींसाठी अंड्याच्या आकारामध्ये असलेले रंगीबिरंगी ओवल इअरिंग एक वेगळा लूक देतं. सध्या गडद रंगाची फॅशन पण आहे, हे इअरिंग घातल्यावर नक्कीच रिफ्रेश वाटाल.

फंकी हुप इअरिंग
कॅज्युअल्सवर ऑल टाईम चांगले वाटणारे हुप्स पुन्हा फॅशनमध्ये आलेत. तरूणींना हे हुप्स हा चांगला पर्याय आहे.

डँगलिंग इअरिंग
कानातले हे ज्वेलरीचाच एक महत्वाचा भाग आहे. त्यांनी तुमचा पेहराव आणखी उठून दिसतो. सध्या डँगलिंग इअरिंगही कुठल्याही आऊटफिटवर शोभणारे आहेत. आकर्षक असे हे कानातले असून त्यावर वेगवेगळे गोंडे असतात. अगदी कुठल्याही पेहरावावर शोभून दिसतील असेच हे कानातले आहेत.